शिवचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे, जर तुम्ही शो चांगला पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की त्याने या स्वप्नाबद्दल बिग बॉसच्या घरात सांगितले होते.
मुंबई / नगर सह्याद्री -
कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन १६ चा फर्स्ट उपविजेता असलेला शिव ठाकरे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी चर्चेत आहे. एकीकडे शिवला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, तर दुसरीकडे तो त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या तयारीत व्यस्त आहे. शिवचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे, जर तुम्ही शो चांगला पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की त्याने या स्वप्नाबद्दल बिग बॉसच्या घरात सांगितले होते.
बिग बॉस सीझन १६ मध्ये शिव ठाकरे प्रेक्षकांना खूप आवडला होता .त्याला शोमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जात होते. अर्चना गौतम आणि प्रियंका चहर चौधरी यांच्यासोबतची त्यांची भांडणे घराघरात सतत चर्चेचा विषय होती. इतकेच नाही तर अब्दू रोजिकसोबतचे त्याचे मैत्रीही प्रेक्षकांना आवडली आजही लोकांना त्यांची मैत्री आवडते. बिग बॉसच्या घरात असताना सिम्मी ग्रेवाल यांच्यासमोर अभिनेत्याने सांगितले की, चित्रपटात काम करण्याचे माझे स्वप्न आहे. त्याला हिरो व्हायचे आहे. मोठमोठ्या पोस्टर्सवर त्याला त्याचा फोटो बघायचा आहे.
शो संपल्यानंतर शिव ठाकरेंला प्रोजेक्ट्सची ओढ लागली. मीडिया वृत्तानुसार , शिव ठाकरे यांना एक मराठी चित्रपट आला असून ते त्यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.२ इडियट्सच्या बॅनरखाली अमोल खैरनार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मात्र, शिवाच्या बाजूने याबाबत माहिती मिळालेला नाही.
शिव ठाकरेंला मराठी इंडस्ट्रीतून खूप चांगल्या ऑफर्स येत असल्याचंही बातमी आहे. इतकेच नाही तर वृत्तानुसार , शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसणार आहेत. मात्र, अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही. केवळ बोले जात आहे. तर. ते काहीही असले तरी आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेंला पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांना अधिक आनंद झाला आहे.
COMMENTS