महाराष्ट्र सरकार अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी विधानसभेत ही माहिती दिली.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्र सरकार अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी विधानसभेत ही माहिती दिली. अवैध दारू व्यापाराची माहिती घेण्यासाठी आम्ही गुप्तचरांचे नेटवर्क तयार करण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दारू व्यवसायावर सरकारने केलेल्या कठोर उपाययोजनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणले, पोलिसांकडे ज्या प्रकारे खबऱ्यांचे नेटवर्क असते, त्याच प्रकारे आम्ही गुप्तचरांचे नेटवर्क उभारण्याचा विचार करत आहोत. ह्या खबऱ्यांकडून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याची माहिती मिळेल. आणि माहिती देणार्यांना बक्षीस म्हणून पैसेही दिले जातील.
प्रश्नोत्तराच्या दरम्यान प्रश्न विचारत अजित पवार यांनी अवैध दारू धंद्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुप्तचरांचे नेटवर्क असू शकते असे सुचवले आणि त्यांनी या खात्याचा ताबा घेतल्यानंतर याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाली. अवैध दारू धंद्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत असल्याने गरज पडल्यास लाखो रुपये या माहिती देणाऱ्यांना देता येईल, असेही ते म्हणाले.
देसाई पुढे म्हणाले की, गुप्तचरांचे नेटवर्क उभारण्याव्यतिरिक्त, एखाद्या भागात अवैध दारू व्यवसायाची प्रकरणे समोर आल्यावर जिल्हास्तरीय अधिकाऱ्याला जबाबदार ठरवण्याच्या पर्यायही सरकार विचारात आहे.
COMMENTS