शशीने विकासचा बचाव करताना सांगितले की, 'सतीश आणि विकास खूप चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये कधीही भांडण झाले नाही.'
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी हे जग सोडले. सतीश यांच्या मृत्यूचे प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे. सतीशच्या मृत्यूबाबत अनेक नवीन खुलासे होत आहेत. यापूर्वी सतीश राहत असलेल्या फार्म हाऊसमधून काही आक्षेपार्ह औषधे सापडल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सतीशचा मित्र विकास मालू यांच्या पत्नीने पतीवर सतीशची हत्या केल्याचा आरोप केला. यावर आता सतीशची पत्नी शशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सतीश कौशिक यांची पत्नी शशी यांनी या प्रकरणी उघडपणे बोलले असून, सान्वी मालूने पतीवर केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. नुकतेच एका मुलाखतीत शशीने विकासचा बचाव करताना सांगितले की, 'सतीश आणि विकास खूप चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये कधीही भांडण झाले नाही. विकास हा आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे त्यामुळे तो पैशासाठी कोणाचीही हत्या करणार नाही. सतीश नुकताच होळी पार्टीसाठी दिल्लीला गेला होता. तेथे पैशाचा व्यवहार झाला नाही.'
शशीने पतीचा मृत्यू ही हत्या असल्याचे फेटाळून लावले आहे. शशीने सांगितले की, 'सतीशच्या हृदयात ९८% ब्लॉकेज होते आणि डॉक्टरांना नमुन्यात कोणतेही औषध आढळले नाही. पोलिसांनी सर्व गोष्टींची पडताळणी केली आहे. ती कोणत्या मुद्यावरून ड्रग्स आणि खुनाबद्दल बोलत आहे हे मला समजत नाही. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर सान्वी या सगळ्यात तिच्या पतीचे नाव का ओढते आहे ते मला कळत नाही. तिचा काय प्लान असू शकतो. कदाचित तिला तिच्या पतीकडून पैसे पाहिजे असतील.'
COMMENTS