समंथा रुथ सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आज तिने हैदराबादमधील पेद्दम्मा मंदिराला भेट दिली.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथा रुथ सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आज तिने हैदराबादमधील पेद्दम्मा मंदिराला भेट दिली आणि देवाचे आशीर्वाद घेतले. नुकतेच सामंथाने तिचा चित्रपट स्क्रीनिंग दरम्यान पाहिला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. आता ती प्रमोशनसाठी सज्ज झाली आहे. मंदिराच्या दर्शनाची छायाचित्रे देव मोहन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.
शकुंतलमचे दिग्दर्शक गुणशेखर, समंथा रुथ आणि अभिनेता देव मोहन पेद्दम्मा तल्ली मंदिरात गेले होते. देव मोहनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत लिहिले, 'एक नवीन सुरुवात! नवीन अंदाजातशाकुंतलमचे प्रमोशन सुरू आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आपले सहकार्य मिळेल ही अपेक्षा आहे. समंथाच्या या चित्रपटासाठी सगळेच आतुर झाले आहेत. देव मोहन आणि समंथा यांचे या चित्रपटासाठी युजर्स अभिनंदन करत आहेत.
चित्रपट १४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. हा प्रकल्प सामंथाचा गुणशेखरसोबतचा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या दंतकथेपासून प्रेरित असून महान कवी कालिदासाच्या अभिज्ञान 'शकुंतलम' या संस्कृत नाटकातून ती साकारली आहे.
COMMENTS