जळगाव। नगर सहयाद्री - काम आटोपून शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी बाईकने जात असलेल्या वकिलाला कंटेनरने धडक ...
जळगाव। नगर सहयाद्री -
काम आटोपून शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी बाईकने जात असलेल्या वकिलाला कंटेनरने धडक दिल्याने या अपघातात वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.योगेश जालमसिंग पाटील (वय ४५, रा. दादावाडी, जळगाव) असं मयत वकिलाचे नाव आहे. धडक देणार्या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मूळचे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील ॲड. योगेश पाटील (वय ४५) हे सद्या जळगाव शहरातील दादावाडी परिसरात वास्तव्यास होते. सायंकाळी नेहरू चौकातून वळण घेत होते. या दरम्यान कंटेनर चालकाने वकिलांच्या दुचाकीला धडक दिली. यात ॲड. योगेश पाटील दुचाकीसह पुढील चाकाखाली चिरडले गेले. तत्काळ नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ॲड. योगेश यांना उचलले. त्यांना छाती, पायाला अन् डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात पाटील यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अपघातानंतर ॲड. योगेश पाटील यांना उचलणाऱ्यांना त्यांनी थॅक्सही म्हटले. बऱ्यापैकी ते बोलत असल्याने किरकोळ दुखापत झाली असावी, असा समज झाला. इर्मजन्सी वॉर्डात बोलता- बोलता ॲड. योगेश पाटील शांत झाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
ॲड. योगेश पाटील यांच्या वडिलांचे आज श्राद्ध असल्याने त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी तमगव्हाणला गेले आहेत. न्यायालयाचे काम आटोपून ॲड. योगेश पाटीलही गावी जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर जिल्हा न्यायालयातील त्यांच्या सहकार्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.
COMMENTS