पीडिता तिच्या मित्रासोबत मंदिरात गेली होती, तेव्हा दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील पालघरमधील विरार भागात २० वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वृत्तानुसार, पीडिता तिच्या मित्रासोबत मंदिरात गेली होती, तेव्हा दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या मित्राच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पीडितेच्या मित्राने फिर्यादीत म्हटले आहे की, तो आणि पीडिता विरार परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या जीवदानी मंदिरात गेले होते. याचदरम्यान धीरज राजेश सोनी आणि यश लक्ष्मण शिंदे यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी पीडितेच्या मित्रालाही मारहाण केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीही पालघरमधील विरार भागातील रहिवासी असून दोघेही नशेचे व्यसनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
COMMENTS