मुंबई । नगर सह्याद्री राखीच्या खासगी आयुष्यामूळ गेल्या दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सोबतच राखी सध्या तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओ 'झूठा...
मुंबई । नगर सह्याद्री
राखीच्या खासगी आयुष्यामूळ गेल्या दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सोबतच राखी सध्या तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओ 'झूठा'मुळे चर्चेत आहे. तिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असलेल्या या गाण्याचे ती जोरात प्रमोशन करत आहे. जोडीदाराने केलेली फसवणूक आणि आईच्या मृत्यूने हताश झालेली राखी असे अनेक दृश्य या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये अक्षरश: राखी ढसा ढसा रडली. नुकतंच एका प्रमोशन दरम्यान तिने आपले 80 हजाराचे बूट फोटोग्राफर्सला दाखवले आहेत. त्यामुळे सध्या तिला नेटकरी बरेच ट्रोल करीत आहे.
'झूठा'या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनदरम्यान राखीला पापाराझींनी स्पॉट केले होते. यादरम्यान तिने कॅमेरामन्सला 80 हजारांचे बूट दाखवले. तेव्हापासून ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. यावेळी राखी कॅमेरामन्सला म्हणते, 'माझे नवीन शूज बघा. ८०,००० चे शूज घेतले... सेम त्या एमसी स्टॅंड सारखे. सॉरी एमसी स्टॅनसारखे. स्टॅन असो की स्टॅंड पण तो खूप चांगला आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. अनेक युजर्सने राखीला चर्चेत येण्यासाठी काहीही करते असं म्हटलं आहे तर, काहींनी तिला चर्चेत राहण्यासाठी तू एमसी स्टॅन सारखे शूज विकत घेतले आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
COMMENTS