केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ट्विट करत रिजिजू यांनी राहुल गांधींना देशाच्या एकात्मतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वर्णन केले
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ट्विट करत रिजिजू यांनी राहुल गांधींना देशाच्या एकात्मतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वर्णन केले. आणि 'पप्पू' म्हणून संबोधले. किरण रिजिजू यांनी लंडनमधील एका काँग्रेस समर्थकाने दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते इंदिरा गांधींचे उदाहरण देत राहुल यांना समजावून सांगतात की, जगातील इतर कोणत्याही देशात भारताविरोधात बोलणे योग्य नाही.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी तीन ट्विट केले. राहुल गांधींच्या २०१४ चा लंडनमधील कार्यक्रमांचा व्हिडीओही मोर आला होता. पहिल्या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे एक वृद्ध हितचिंतक राहुल गांधींना सल्ला देताना दिसत आहेत. यामध्ये राहुल स्टेजवर बसले आहेत, तर समोरचे एक वृद्ध इंदिरा गांधींचे उदाहरण देऊन त्यांना सल्ला देत आहेत.
वृद्ध यांनी सांगितले की, 'तुमची आजी इंदिरा गांधींनी मला नेहमीच आशीर्वाद दिला. त्या माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारख्या होत्या. त्या एक अद्भुत स्त्री होत्या. त्या एकदा लंडनला आल्या होत्या. येथील पत्रकार परिषदेत त्यांना मोरारजी देसाईंबाबत प्रश्न विचारण्यात आला, की त्यांचा अनुभव काय होता? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मला येथे भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलायचे नाही. पण तुम्ही सतत भारतावर हल्ले करत आहात. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या आजीच्या बोलण्यातून काहीतरी शिकताल, जे त्यांनी इथे सांगितले होते. कारण मी तुमचा शुभचिंतक आहे आणि मला तुम्हाला पंतप्रधान म्हणून बघायचे आहे. यावेळी राहुल फक्त हसताना दिसले.
हा व्हिडिओ शेअर करत किरेन रिजिजू यांनी लिहिले की, 'राहुल गांधी जी आमचे ऐकणार नाहीत पण मला आशा आहे की ते त्यांच्या समर्पित शुभचिंतकांचे ऐकतील!'
किरेन रिजिजू यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी ऑक्सफर्डमध्ये भाषण देत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत किरेन रिजिजू यांनी लिहिले की, 'काँग्रेसच्या या स्वयंघोषित युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा माणूस भारताच्या एकात्मतेसाठी अत्यंत घातक ठरला आहे. आता तो लोकांना भारताची फाळणी करण्यासाठी भडकावत आहे. भारताचे सर्वात लोकप्रिय आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच मंत्र आहे 'एक भारत श्रेष्ठ भारत'.
आपल्या तिसऱ्या पोस्टमध्ये किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना अगदी पप्पू असे संबोधले. त्यांनी लिहिले की, 'भारतीय लोकांना माहित आहे की राहुल गांधी पप्पू आहेत पण परदेशी लोकांना ते पप्पू आहेत हे माहीत नाही. त्यांच्या मूर्ख विधानांवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही पण समस्या अशी आहे की त्यांच्या भारतविरोधी विधानांचा भारतविरोधी शक्ती भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी गैरवापर करतात.
Rahul Gandhi Ji will not listen to us but I hope he listens to his devoted well wishers! pic.twitter.com/ghuJ2mqSii
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 8, 2023
COMMENTS