खासदार शरद पवार यांचा इशारा | आमदार नीलेश लंके यांचे कार्य कौतुकास्पद निघोज / नगर सह्याद्री - आमदार नीलेश लंके यांनी मतदार संघ तसेच मतदारसं...
खासदार शरद पवार यांचा इशारा | आमदार नीलेश लंके यांचे कार्य कौतुकास्पद
निघोज / नगर सह्याद्री -
आमदार नीलेश लंके यांनी मतदार संघ तसेच मतदारसंघाबाहेर सुद्धा चांगले काम केले असून अशाप्रकारे कार्यक्षमतेने काम केल्यास विकास खर्या अर्थाने होत असतो. शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोलमडून गेला असून शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण सरकारला करुन देण्यासाठी विरोधी पक्ष भक्कमपणे काम करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील आमदार नीलेश लंके यांचा वाढदिवस, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे नामकरण, विकास कामांचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांचा विबिध संस्था तसेच ग्रामस्थ, लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठान वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार नीलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, अशोकराव सावंत, जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, आदर्श गाव टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच व पंचायत समिती माजी सदस्या अरुणाताई घोडे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, अतुल लोखंडे, राहुल सागर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निबंधक गणेश औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. आबासाहेब खोडदे, कान्हुरपठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशिलाताई ठुबे, पतसस्थेचे चेअरमन वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात व सर्व संचालक मंडळ, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, माजी सभापती गंगाराम बेलकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा. पवार म्हणाले रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जगात अजरामर आहे. याचा देशवासीयांना अभिमान आहे. आमदार नीलेश लंके यांनी सुद्धा मतदार संघ असो किंवा ईतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे करुन जनतेची सेवा केली आहे. शेतीमालाला भाव नाही, सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात मला निवेदन दिले आहे. लोकसभा, राज्यसभा अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याचे काम विरोधी पक्षांकडून होणार आहे. दैनंदिन जीवनात कांद्याचा खर्च अत्यल्प असून कांदा प्रतिकिलो उत्पादन घेण्यासाठी आठ ते दहा रुपये खर्च येतो. आणि कांदा फक्त चार रुपये किलो विकला जातो. याची विचारणा सरकारकडे करण्यात आली असून कांदा प्रश्नी सरकारला जाब विचारण्याचे काम करुन शेतकर्यांना न्याय देण्याची भुमिका घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पतसस्थेचे संस्थापक बाबासाहेब कवाद यांनी पतसंस्था चळवळीत मोठे काम करुन सर्वसामान्य जनतेला पाठबळ दिले आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्याकडे राज्य सहकारी बँक जबाबदारी दिली. त्यांनी अतिशय चांगले काम केले. जी एस महानगर बँकेच्या माध्यमातून चांगले काम शेळके यांनी केले. उदय शेळके यांनी जिल्हा बँक, जी एस महानगर बँकेची जबाबदारी घेऊन या दोन्ही बँकाना नावलौकिक मिळवून दिला. दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत. मात्र जी एस महानगर बँकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्व कार्यतत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नीलेश लंके यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात काम करताना साधे जीवन जगत सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम त्यांनी केले.
माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोना सेंटर असो किंवा सामाजिक कामांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवाभाव केला आहे. सामाजिक काम करताना आमदार लंके यांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात भरभरून दिले. त्याचा फायदा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. कांदा, अवकाळी पाउस, बिबट्या, विजेचा प्रश्न ही संकटे मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात काहीच दिले नाही. फक्त आश्वासनांचा पाउस पाडण्याचे काम शिंदे - फडणवीस सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकार भुलभुल्लया करीत लोकांना ईतर विषयांवर केंद्रीत करीत आहेत.
आमदार नीलेश लंके यावेळी म्हणाले, पवार यांचा सामाजिक विचार घेऊन मतदारसंघात सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना पाठबळ देण्याचे काम केले. यामध्ये कोरोना सेंटर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सायकल वाटप कसे विविध उपक्रम राबवले, कोरोना सेंटरमध्ये ३१ हजार पेशंट बरे झाले. राहुल सागर या उद्योजकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायकल वाटपसाठी मदत झाली. त्यांनी एक हजार सायकली दिल्या. आज सात हजार सायकलचे वाटप झाले आहे. हे सर्व पवार साहेब यांच्यामुळे शक्य झाले. शंभर कुटुंबाला घरकुल वाटप करण्याचे भाग्य मला आज मिळाले. पवार साहेब हे आपले पांडुरंग आहेत. पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे. मतदारसंघात शरदचंद्रजी पवार साहेब मल्टिस्टेट हॉस्पिटलची संकल्पना असून तुमच्या आशिर्वादाने हा संकल्प मी पुर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार लंके यांनी दिली. या मतदारसंघात दोन अभ्यासिका ईमारत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. निघोज आणी कान्हुरपाठार येथील अडीच कोटीचा निधी अभ्यासिका इमारतीसाठी उपलब्ध झाला असून आज पवार यांच्या हस्ते निघोज येथील अभ्यासिका ईमारतीचे उद्घाटन झाले आहे. या परिसरात कांदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळण्यासाठी पवार यांनी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निघोज नागरी पतसंस्थेचे नामकरण आज बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे संस्थापक बाबासाहेब कवाद हे साहेबांचे निस्सीम भक्त होते. आज पतसंस्थेचे स्वप्न खर्या अर्थाने पुर्ण झाले असून पवार साहेब यांच्या आशिर्वादाने सहकार चळवळ भक्कमपणे उभी असून ग्रामीण भागाचा विकास पतसंस्था चळवळीमुळे झाला असल्याचे प्रतिपादन आमदार लंके यांनी व्यक्त केले. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी यावेळी पतसस्थेची माहिती दिली. यावेळी माजी मंत्री अशोक सावंत, ठकाराम लंके आदिंची भाषने झाली. वीस हजार पेक्षा जास्त लोकांनी यावेळी गर्दी केली होती.
माजी सरपंच व निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, माजी चेअरमन रामदास वरखडे तसेच संचालक मंडळ व ग्रामस्थ, शेतकरी यांनी पवार साहेब यांना कांदा या विषयावर सविस्तर निवेदन दिले होते. त्याच निवेदनाची माहिती पवार यांनी आपल्या भाषणातून देउन कांदा उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
COMMENTS