हाताचे बोट, कान तोडले : सव्वा लाखाचा ऐवज चोरीला पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पोखरी येथे वारणवाडी रस्त्यावरील पवार यांच्या घरावर ...
हाताचे बोट, कान तोडले : सव्वा लाखाचा ऐवज चोरीला
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील पोखरी येथे वारणवाडी रस्त्यावरील पवार यांच्या घरावर बुधवारी (दि. १५) रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जबरी दरोडा टाकून घराबाहेर झोपलेल्या वृद्धेवर धारधार हत्याराने हल्ला करून डाव्या हाताचे बोट व कान तोडले आहेत.
या धाडसी चोरीत सव्वालाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असून वृद्धेला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी टाकळी ढोकेश्वर येथील साई सावली हॉस्पिटलमध्ये जखमीची भेट घेऊन चौकशी केली. हे चोरटे राहुरी किंवा जुन्नर तालुयातील असण्याची शयता व्यक्त केली जात आहे. यासबंधीची फिर्याद पंडीत महादु पवार यांनी पारनेर पोलिसात दिली आहे.
पारनेर तालुयातील पोखरी येथील पंडित महादू पवार यांचे घर गावापासून एक किलोमिटर अंतरावर आहे. बुधवारी रात्री २.३० च्या सुमारास चोरांनी त्यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. प्रथम दरवाजा बाहेरून कड्या लावुन पडवीत झोपलेल्या भीमाबाई महादु पवार (वय ७०) यांच्या कानातील व गळ्यातील दागिने व कंबरेच्या पिशवीतील पैशाची मागणी केली. भीमाबाई यांनी विरोध करताच चोरट्यांनी धारदार हत्याराने हल्ला करीत कंबरेच्या पिशवीतील १० ते १२ हजार रुपये रोख व गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुडल, फुल असे अडीच तोळ्याच्या आसपास दागिने काढुन घेतले. वृद्धा आरडा ओरड करत असल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोयात धारदार शस्त्राने वार केले. एक वार डाव्या हाताचे बोटावर लागल्याने बोट तुटले. चोरटयांनी सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज घेऊन पलायन केले.गावात चोरीची माहिती समजताच बाळासाहेब शिंदे, साहेबराव करंजेकर, दत्ता बोचरे, कुंडलिक वाकळे, दत्ता शिंदे या तरुणांनी पवार यांच्या वस्तीवर धाव घेतली. गावकर्यांची चाहुल लागताच चोरांनी पलायन केले. जखमीला तरुणांनी टाकळी ढोकेश्वर येथे आणि नंतर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. नगरहुन श्वान पथकासह पोलिस अधिकार्यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.
पोलिस निरीक्षकांना सलामी
पारनेरला नव्याने आलेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड येथे चांगले काम केले. धाडसी अधिकारी म्हणून लौकिक मिळवला मात्र, पारनेरमध्ये हजर होताच पोखरी येथे धाडसी दरोडा टाकत चोरांनी त्यांना सलामी दिली. तपासाचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
COMMENTS