पारनेर | नगर सह्याद्री सध्या राज्यामध्ये शिंदे-फडणवीसचे सरकार काम करत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह इतर रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ ...
पारनेर | नगर सह्याद्री
सध्या राज्यामध्ये शिंदे-फडणवीसचे सरकार काम करत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह इतर रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. याचे श्रेय पारनेरचे लोकप्रतिनिधी सध्या लाटत आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या निधीबाबत लोकप्रतिनिधींचे वागणे बरे नसून त्यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजप तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, राहुल शिंदे व शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे.
पारनेर येथील पत्रकार परिषदेला कोरडे, चेडे, रोहकले, झावरे यांच्यासह सचिन वराळ, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, पंकज कारखिले, सतीश पिंपरकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून शिंदे फडणवीस सरकारने पारनेर तालुयासाठी पहिल्यांदा एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तुमच्या सरकारच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कधी उपलब्ध झाला होता का, हे पण जाहीर करावे. तालुयातील रस्त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर असून तुम्ही सरकारमध्ये आहात काय? हे पण जाहीर करावे, असा सवालही भाजप पदाधिकार्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये व यातून जनतेची दिशाभूल करू नये, असा टोलाही लगावला आहे.
सध्या राज्यामध्ये शिवसेना-भाजपचे सरकार असून विविध कामाच्या संदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रोहकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध कामासंदर्भात निधीची मागणी केली होती.
तालुक्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ आहे का?
तालुयाचे लोकप्रतिनिधी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दौरे करतार. आपला तालुका सोडून इतर तालुयांमध्ये ते कार्यक्रम करत असल्याने या कामासंदर्भात त्यांनी कधी पाठपुरावा केला किंवा ही कामे त्यांनी कशी मंजूर केली? तालुयासाठी लोकप्रतिनिधींना वेळ आहे का? असा सवाल तालुकाध्यक्ष चेडे व राहुल शिंदे यांनी केला आहे.
किमान अण्णा हजारे यांचे तरी श्रेय घेऊ नये
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीसह परिसरातील अनेक रस्त्यांसंदर्भात केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. परंतु लोकप्रतिनिधींनी अण्णा हजारे यांनी सुचवलेल्या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोरडे यांनी केला. किमान अण्णांना तरी सोडा, अशी टीका आ. नीलेश लंके यांच्यावर करण्यात आली.
COMMENTS