मुंबई / नगर सह्याद्री - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना उच्च न्यायालयाने दापोली रिसॉर्ट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. ...
मुंबई / नगर सह्याद्री -
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना उच्च न्यायालयाने दापोली रिसॉर्ट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात 28 मार्चपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने 28 मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे परब यांना दिलासा मिळाला आहे.
अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका रिसॉर्टशी संबंधित ईडीचा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे अशी विनंतीही त्यांनी केली होती.
त्यानंतर कोर्टाने 23 मार्चपर्यंत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारावाई करू नये असे निर्देश ईडीला दिले होते. आता ही मुदत 28 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणीसाठी नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
COMMENTS