मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईसह राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातच उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत किम...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईसह राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातच उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत किमान तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ७२ तासांत ठिकठिकाणी पाऊस आणि उन्हाचे चटके बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये देखील दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. रिमझिम पाऊस पडल्याने नागरिक सुखावले होते. आता पुन्हा एकदा मुंबईत उन्हाची झळ बसताना दिसत आहे. मात्र पुढचे काही दिवस मुंबईमध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे.
मुंबई - पुणे शहरात १३ ते १५ मार्च या कालावधीत वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात ७ व ८ मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली आहे. शहराचे कमाल तापमान ३० अंशांवरून पुन्हा ३५ ते ३६ अंशांवर गेले आहे.
उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात १३ ते १५ मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान खात्याने दिला आहे. शहरात एकीकडे थोड्याशा पावसानेही नागरिक सुखावत आहेत तर दुसरीकडे शेतकरी या अवकाळीने त्रस्त झाला आहे. अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच राज्यात पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
COMMENTS