पैठण/ नगर सह्याद्री - पैठण तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे. बिडकिन पोलिस ठाणे हद्दीतील शिवणाई येथील मुलाच्या विरहात आईने राहत्या घरात गळफ...
पैठण/ नगर सह्याद्री -
पैठण तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे. बिडकिन पोलिस ठाणे हद्दीतील शिवणाई येथील मुलाच्या विरहात आईने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूमुळे आईने देखील जीवनयात्रा संपविली आहे.
शिवणाई (ता. पैठण) येथील रितेश काळे याने २ मार्चला आत्महत्या केली होती. मुलाला काही दिवस झाले असतानाच आई रुख्मणबाई रमेश काळे यांनी देखील राहत्या घरात बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैठण तालुक्यातील शिवनाई येथील अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय शालेय विद्यार्थी रितेश रमेश काळे विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रितेश काळे आई– वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
रितेशच्या आई रुखमनबाई रमेश काळे यांना आपल्या मुलाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी गुरुवारी (२२ मार्च) दुपारी राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांमुळे शिवनाई व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केले आहे. रुखमाई काळे यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.
COMMENTS