मुंबई - सुकेश चंद्रशेखर हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्या सोबत जॅकलिन फ...
मुंबई - सुकेश चंद्रशेखर हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्या सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही देखील कमालीच्या चर्चेत आहे. मनीलाँड्रिंग प्रकरणात चर्चेत असणार्या सुकेशवर लवकरच चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सुकेश सध्या दिल्लीतील मंडोळी कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावरील सिनेमाचे कथानक लिहिण्यासाठी आनंद कुमार थेट मंडोळी कारागृहात पोहोचले आहे. मंडोळी कारागृहातील पोलीस अधिकार्यांसोबत त्यांनी चर्चा केली असून त्याच्या सोबत बसून ते चित्रपटाचे कथानक लिहिणार आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तो तुरुंगात असून त्याच्यावर अनेक आरोप आहे.
चित्रपट निर्माते आनंद कुमार यांच्या चित्रपटात सुकेशच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आणि फसवणुकीची संपूर्ण कथा यामध्ये दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार अद्याप हे अस्पष्ट आहे. सुकेश २०० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्याचबरोबर या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही प्रामुख्याने नावे आहे.
दोघेही सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी सुकेशवर झालेल्या आरोपांमध्येही हातभार लावला होता. अशा परिस्थितीत जॅकलीन आणि नोरा फतेही यांची भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सेलिब्रिटी आणि उद्योगपतींकडून पैसे उकळल्याचा आणि फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांना २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
COMMENTS