नागपूर / नगर सह्याद्री - नागपूरमध्ये NIA ची छापेमारी केली आहे. नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळ...
नागपूर / नगर सह्याद्री -
नागपूरमध्ये NIA ची छापेमारी केली आहे. नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी पहाटे चार वाजताच ही धाड टाकण्यात आली आहे. मोबाईलवरुन पाकिस्तानामध्ये संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली होती. त्याच माहितीवरुन ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी पहाटे चार वाजताच एनआयएच्या (NIA) टीमने नागपूरच्या सतरंजीपुरा भागात छापा टाकला आहे. पाकिस्तानमधील व्यक्तीशी वॉट्सअप्पवरून संशयास्पद रित्या संवाद साधल्याप्रकरणी एनआयनेही धाड टाकल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी अख्तर अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे.
या चौकशीमध्ये अद्याप कोणालाही ताब्यात घेतले गेलेल नाही. त्यामुळे एनआयची टीम चौकशीनंतर परत गेल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएच्या या धाडीमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
COMMENTS