दिल्ली / नगर सह्याद्री - दिल्लीमधील गोविंदपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मावशीनेच भाचीसोबत गैरवर्तन केले आहे. माणूसकीला काळीमा फासणा...
दिल्ली / नगर सह्याद्री -
दिल्लीमधील गोविंदपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मावशीनेच भाचीसोबत गैरवर्तन केले आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणीने कशीबशी त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटली आणि एका एनजीओच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
पीडित तरुणीच्या आई वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे ती आपल्या मावशीसोबत राहत होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मावशीने आरोपी नंदूला 55 हजार रुपयांना विकले होते. नंदूही गोविंदपुरीत राहतो. तसे ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, नंदूने तिला विकत घेतले आणि आपल्या घरी नेले आणि नंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
तसेच अनेकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही तिने सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी एक व्यक्ती तिचा विनयभंग करण्यासाठी आला होता. मात्र, तिने चकमा देत तेथून पळ काढला. यावेळी तिला एका एनजीओचा पत्ता मिळाला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. एनजीओशी संबंधित लोकांनी तिला पोलिसांकडे नेले. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या पथकाने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याआधारे आरोपीविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी नंदू याला अटक करण्यात आली आहे.पोलीस आरोपी महिलेचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहे.
COMMENTS