मुंबई / नगर सह्याद्री - राज्याच्या राजकारणातून सध्या एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी ध...
मुंबई / नगर सह्याद्री -
राज्याच्या राजकारणातून सध्या एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
COMMENTS