मुंबई । नगर सह्याद्री - मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे दिवसेंदिवस अनेक मृत्यू होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवर महामार्गावर...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे दिवसेंदिवस अनेक मृत्यू होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कोळशाने भरलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तीनपैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय विश्वनाथ खैर,रा.सातारा असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून इतर दोन जणांची ओळख पटवणे सुरू आहे.
पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यंत्रणाच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.
उर्से गावच्या परिसरात शु्क्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाग्रस्त कार ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी महामार्गावरून एक कोळशाने भरलेला ट्रक जात होता. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या कारने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात कारचालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
COMMENTS