मुंबई । नगर सह्याद्री - सध्या सर्वत्र गौतमी पाटील ची चांगलीच हवा आहे.अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत गौतमी पाटीलचे वेड लावले आह...
मुंबई । नगर सह्याद्री -
सध्या सर्वत्र गौतमी पाटील ची चांगलीच हवा आहे.अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत गौतमी पाटीलचे वेड लावले आहे. काही दिवसांपूर्वीच एका पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये केले होते. आता तर सातारा जिल्ह्यातील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानंतर गावात चर्चेला उधाण आले आहे.
सतीश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आश्विन या त्यांच्या शर्यतीच्या बैलावर जीवापाड प्रेम आहे. दर वर्षी ते या बैलाचा वाढदिवस धूम धडाक्यात साजरा करत असतात. आज आश्विन या शर्यतीच्या बैलाचा तिसरा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.
या वर्षी तर चक्क त्यांनी गौतमी पाटीलचाच कार्यक्रम घेतल्याने गावकऱ्यांमध्ये मात्र चांगलच उत्साहाच वातावरण आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी गावात सुरू आहे. गावामध्ये एका शेतात मोठं स्टेज उभरणीच काम सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी गावात सुरू आहे.
COMMENTS