मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फोन करून धमकी देण्यात आली आहे. एका महिलेने ...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फोन करून धमकी देण्यात आली आहे. एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका डिझायनर महिलेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनिष्का असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. अमृता फडणवीस यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. संबंधित आरोपी महिला अमृता यांच्या जवळपास 16 महिने संपर्कात होती.
एका गुन्ह्यात आम्हाला मदत करा अशी त्याबदल्यात तुम्हाला १ कोटी रुपये देऊ, अशी ऑफर महिलेसह तिच्या वडिलांनी दिली होती. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणाकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले आहे. मात्र, तरीही आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्यांना फोन तसेच मॅसेज करणे सुरूच ठेवले आहे.
इतकंच नाही तर त्यांनी अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षरीत्या धमकावून, कट रचून १ कोटींची लाच ऑफर करण्याचा केला प्रयत्न. दरम्यान, याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रार दाखल होताच, पोलिसांनी अनिष्का नावाच्या महिलेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीलाच एका महिलेने अप्रत्यक्षरित्या धमकावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
COMMENTS