मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईतून धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटन...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईतून धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महतेचा गुन्हा दाखल केला आहे.
एका प्रेमी युगुलाने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत 21 वर्षीय प्रियकर साफ-सफाईचे काम करत होता. तर त्याची प्रियसी ही सोळा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती.
दोघे कांदिवलीच्या जानुपाडा परिसरात शेजारीच राहत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध केल्याने दोघांनी जीवनयात्रा संपवली आहे.
कांदिवली, जानुपाडा परिसरात राहणाऱ्या प्रेमी युगुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याने दोघांनीही उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. यात दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. मृत तरुण-तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहे.
प्रेमी युगुलांच्या टोकाच्या निर्णयाने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS