गोंदिया। नगर सह्याद्री - गोंदिया जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीच...
गोंदिया। नगर सह्याद्री -
गोंदिया जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा अश्लील चित्रफिती दाखवून छळ करणारी घटना गोंदिया जिल्हयाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात घडली आहे. हेमंतकुमार गुलाराम येरणे (35), रा.इसापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीला असून विशेष सत्र न्यायालयाने 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पीडित विद्यार्थिनी ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडिता व तिच्या मैत्रिणींच्या पाठीवरून हात फिरवायचा. कपडे ओढून आपल्या कक्षात बोलवायचा. एकांतात आपल्याकडील मोबाइलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवत पीडित विद्यार्थिनीला 'तू सुंदर आहे. तू मला आवडते' असा संवाद साधायचा तसेच तिच्या मैत्रिणींशीही असेच अश्लिल वर्तन करायचा.
या सगळ्या प्रकारावर पीडित मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत त्याची लैगिंक इच्छा असल्याचे आपल्या बयाणामध्ये सांगितले आहे. ज्यानंतर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या शिक्षकाविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
COMMENTS