श्रीगोंदा | नगर सह्याद्री नीलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका व शौर्य अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमि...
नीलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका व शौर्य अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.
आ. लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. हरियाणा, पुणे, नगर, बीड, नाशिक, नागपुर आदी ठिकाणावरून ४०१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुरूष खुला गट, प्रथम क्रमांक अंकित कोजाद, व्दितीय करण आलकुटी, तृतीय करण गोडवे, तसेच महिला खुला गट प्रथम साक्षी भंडारी, शितल भंडारी, भाग्यश्री भंडारी असे अनुक्रमे आळकुटीतील सख्या बहिणींनी पारितोषिक पटकावले. ३ कि.मी. मुले रोहित मिंदर, नवनाथ बाचकर, आकाश शिंदे, मुलीमध्ये सुरेखा मातने, गुळवे प्रिया, समृध्दी जाधव असे अनुक्रमे नंबर पटकावले. या सर्व स्पर्धकांना आ. लंके याच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. स्पर्धेसाठी सुनील पंडित, भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, अख्तर भाई शेख, प्रशांत ओगले, विजय शेंडे, असिफ भाई इनामदार, नाना कोथबिरे, आप्पा सोनवणे, नितिन डाडर, मुजफ्फर मालजप्ते, जठार, मंगेश सूर्यवंशी, फिरोज जकाते, माउली रायकर, उदयनराजे माने, मयुर बनसुडे आदींचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी शौर्य व त्रिदल अकादमीचे संचालक किरण पवार, खामकर, चंद्रकांत मखरे, कोळपे पाटिल, श्रेयश गांधी, सुशांत राऊत, आकाश परदेशी, अमोल जगधने यांनी परिश्रम घेतले. नीलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष तांबोळी यांनी आभार मानले.
माझ्या वाढदिवसा निमित्त श्रीगोंदा मध्ये प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हा स्तरीय मॅरेथॉनचे आयोजन केले. अशाच स्पर्धेचे पुढील काळात आयोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले, तरुणांत खेळाची आवड निर्माण होते, असे आ. नीलेश लंके म्हणाले.
COMMENTS