उत्तरप्रदेश। नगर सह्याद्री - लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच व आनंदाचे वातावरण सर्वत्र असते थाटामाटात आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होईल, ...
उत्तरप्रदेश। नगर सह्याद्री -
लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच व आनंदाचे वातावरण सर्वत्र असते थाटामाटात आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होईल, अशी आस घरातील लोकांना असते. मात्र, लग्नाच्या दिवशीच एका कुटुंबावर दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
एका शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलीचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातील अमरोहा गावातील हसनपूर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. कविता (वय 20 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. लग्नाच्या दिवशीच नवरीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोतवाली परिसरातील रुस्तमपूर खादर गावात शेतकरी चंदकिरण हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी कविता (20) हिचा विवाह हसनपूर तहसीलमधील रहिवासी मिंटू सैनी याच्याशी होणार होता.
मात्र, लग्नाच्या आधीच कविता तापाने फणफणली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. कवितावर गेल्या ५ दिवसांपासून मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
इकडे लग्नाची तारीख जवळ येत होती. दुसरीकडे, कविताच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दुर्देवी बाब म्हणजे विवाहाआधीच तिला मृत्युने कवटाळलं. तापामुळे लग्नाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूने दोन्ही कुटुंबातील लग्नाचा आनंद दुःखात बदलला आहे.
दरम्यान, कविताची प्रकृती अधिकच बिघडल्याने डॉक्टरांनी कविताच्या जगण्याची आशा नसल्याचं कुटुंबीयांना सांगितले होते.
COMMENTS