मध्यप्रदेश / नगर सह्याद्री - दोन दिवसांपूर्वी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के...
मध्यप्रदेश / नगर सह्याद्री -
दोन दिवसांपूर्वी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे आज सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. ग्वाल्हेरच्या आग्नेय दिशेला २८ किमीवर या भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
An earthquake with a magnitude of 4.0 on the Richter Scale hit 28km SE of Gwalior, Madhya Pradesh today at 10:31 am IST: National Centre for Seismology pic.twitter.com/FvXdeqwrZl
— ANI (@ANI) March 24, 2023
COMMENTS