पारनेर | नगर सह्याद्री महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नसुन शासनाने आरक्षणा बरोबर अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे महिला...
महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नसुन शासनाने आरक्षणा बरोबर अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे महिलांनी कर्तृत्व सिध्द करण्यासाठी धडाडीने पुढे यावे, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीच्या राणीताई लंके यांनी महिला दिनानिमित्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवतेज मित्र मंडळाच्या सभागृहात बाभुळवाडे नारीशक्ती संमेलन थाटात संपन्न झाले. सुमारे दीडशे महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनाला प्रमुख पाहुण्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके यांची खास उपस्थिती होती. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी तमाम बाभुळवाडेकर महिलांना आपले कार्य कर्तृत्व साकार करण्यासाठी धडाडीने पुढे येण्याचे आवाहन केले. महिलांच्या सक्रिय सहभागातूनच चांगले विकास प्रकल्प मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बाभुळवाडे गावच्या विकासकामांना पूर्ण पाठबळ देऊन महिला सक्षमिकरणासाठी आपण कायम प्रयत्नशिल असल्याची ठोस भूमिका लंके यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्याध्यक्ष जितेश सरडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निलेश लंके प्रतिष्ठानचे बाभुळवाडे अध्यक्ष गणपत जगदाळे होते. संमेलनाला शिवतेज मित्र मंडळाचे प्रेरणास्थान दिलीप बोरुडे, आधारस्तंभ सचिनदादा जगदाळे, मार्गदर्शक बाबुराव क्षिरसागर, शिवतेज कार्याध्यक्ष जुबेरभाई पठाण, शिवाजी जगदाळे आवर्जून उपस्थित होते. या संमेलनाच्या समारोपात बाभुळवाडे ग्रामपंचायतीच्या सदस्या सविताताई जगदाळे, निशिगंधा बोरुडे, सौ. भावना जगदाळे आणि प्रमोद खणकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन खास सन्मान करण्यात आला. संमेलनाच्या संयोजन समितीच्या कार्यशील महिला सदस्या योगिताताई दातखिळे, सविता खणकर, अंजुम पठाण, सुरेखाताई बोरुडे, पुनम क्षिरसागर, कामिनीताई कदम, अस्मिताताई पंडित, पुजा जाधव, लताताई आणि मीना बोरुडे यांचा प्रमुख पाहुण्या राणीताई लंके यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संमेलनाचे सूत्रसंचालन शिवतेज संस्थापक कृष्णा दादा यांनी केले.
COMMENTS