वडनेर हवेली येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील वडनेर हवेली येथे शिंदे मळा रस्त्यावर दहा लाख रुपयां...
वडनेर हवेली येथे दहा लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन
सुपा | नगर सह्याद्रीपारनेर तालुयातील वडनेर हवेली येथे शिंदे मळा रस्त्यावर दहा लाख रुपयांच्या पुलाच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या हस्ते करण्यात आला.
वडनेर हवेली येथे अनेक वर्षापासून शिंदे मळा-घडले मळा रस्त्यावर पुलाची मागणी होती. सतीश भालेकर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या पुलासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी आणला. यावेळी सतीश भालेकर यांनी अनेक वर्षापासून वडनेर हवेली विकास कामांपासून वंचित राहिले आहे मात्र आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक विकास कामे नुकतेच मंजूर केले आहेत. वडनेर हवेली ते कर्डिले मळा येथे जाण्यासाठी लोकांना रस्त्याची मोठी समस्या आहे, पावसाळ्यात अडचणी निर्माण होतात. या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके आणि आमदार लंके यांच्याकडे केली.
राणी लंके म्हणाल्या, गावचा सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी महत्त्वाचे आहेत. ग्रामविकास हेच आपले ध्येय आहे. भविष्यात वडनेर हवेली ते कर्डिले मळा रस्त्यासाठी आमदार लंके यांच्या माध्यमातून तरतूद केली जाईल.
यावेळी रावसाहेब रेपाळे, भास्कर भालेकर, कारभारी भालेकर, अरुण बढे, साहेबराव वाळुंज, भाऊसाहेब भालेकर, भाऊसाहेब हारदे, विकास शिंदे, योगेश शिंदे, दिगंबर भालेकर, शरद भालेकर, अमोल लतांबळे, शेखर भालेकर, गणेश भालेकर, गोरख राऊत, गणेश हारदे, सौरभ वाळुंज, उद्धव भालेकर, सचिन बढे, बाबाजी बढे, रामराव रेपाळे, आबासाहेब रेपाळे, सुखदेव बढे, मारुती कर्डिले, संदीप राऊत, विक्रम भालेकर आदी उपस्थित होते.
COMMENTS