पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील ससून रुग्णालयात एक खळबळजनक गोष्ट घडली आहे. या रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरून एका महिला डॉक्टरने उडी मारली...
पुणे / नगर सह्याद्री -
पुण्यातील ससून रुग्णालयात एक खळबळजनक गोष्ट घडली आहे. या रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरून एका महिला डॉक्टरने उडी मारली आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. त्या महिला डॉक्टरवर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटली नाही. घटनेनंतर बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या महिला डॉक्टरने एवढं टोकाचं पाऊल का उचलले याबद्दल अजून काही स्पष्ट झालेलं नाही.
COMMENTS