श्रीगोंदा | नगर सह्याद्री स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने भारत देशाला उज्वल भविष्य मिळवून दिले. लोकशाही जिवंत ठेवली; परंतु भाजप सत्तेवर ...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने भारत देशाला उज्वल भविष्य मिळवून दिले. लोकशाही जिवंत ठेवली; परंतु भाजप सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात लोकशाही ऐवजी हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांनी केली.
श्रीगोंदा येथे काँग्रेसच्या सत्याग्रह सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात रविवारी (दि. २६) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेबद्दल निषेध सत्याग्रह सभेचे आयोजन केले होते. यावेळी महात्मा गांधी व स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागवडे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर गांधी घराण्यावर संपूर्ण देशवासियांचे अतोनात प्रेम आहे. देशाच्या हितासाठी गांधी घराण्याचा समर्थपणे वारसा चालवणारे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. हे भाजप सरकारचे मोठे षडयंत्र आहे. यापुढे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व देशवासीयांनी एकत्र येत आवाज उठवून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. देशावर भाजप सरकारने मोठा कर्जाचा डोंगर वाढवला. जगातील प्रथम क्रमांकावर असणारा देश आज ४७ व्या क्रमांकावर आहे. देशात खासगीकरणाचे भयानक वादळ या सरकारने सुरू केले असून, सर्व क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारने चालवला आहे. भावी पिढीला कंत्राटी पद्धतीवर नोकरी असणार आहे. राहुल गांधींनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा काढून केंद्रातील सत्ताधारी सरकारचे कारनामे जनतेसमोर मांडत असताना केंद्र सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ही निंदनीय व निषेधाची बाब आहे.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके सावता हिरवे, राकेश पाचपुते, डी. आर.काकडे, भाऊसाहेब बरकडे, मेजर चांगदेव पाचपुते, राहुल साळवे, महेश कवडे, पोपट बोरुडे, रुपेश इथापे, भाऊसाहेब खेतमाळीस, शहाजी गायकवाड, शरद कुदांडे, अॅड. सुनील भोस, भूषण शेळके, धिरज खेतमाळीस, विठ्ठल वाळुंज आदींनी भाजपवर टीका केली. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधाताई नागवडे व राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व तालुका काँग्रेसच्या वतीने स्मितल वाबळे व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी सत्याग्रह सभेचे आयोजन केले होते. श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार नीलेश वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
COMMENTS