पारनेरात युवक काँग्रेसच्यावतीने भाजप हटावचा नारा पारनेर | नगर सह्याद्री लोकशाहीमध्ये सत्ताधारी, विरोधक यांच्यामध्ये टीकाटिप्पणी कायमच चालू...
पारनेरात युवक काँग्रेसच्यावतीने भाजप हटावचा नारा
पारनेर | नगर सह्याद्रीलोकशाहीमध्ये सत्ताधारी, विरोधक यांच्यामध्ये टीकाटिप्पणी कायमच चालू असते परंतु सत्ताधार्यांवर टीका केल्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपा करत आहे.त्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे असल्याची टीका पारनेर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ या ठिकाणी गावठाण चौकात पारनेर युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश शिंदे यांचा नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शने करण्यात आली,’ भाजपा हटाव देश बचाव, मोदी सरकार चले जावो च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी यावेळी पारनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे म्हणाले, राहुल गांधींची खासदारकी रद्द केली कारण राहुल गांधी सतत लोकसभेत मोदी सरकारला धारेवर धरत होते,त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याची जी कृती केली ती बेकायदेशीर व लोकशाहीला शोभणारी नाही.देशात हुकूमशाही आल्यासारखे वाटत आहे. देशातील जनता ती होऊ देणार नाही.ज्या पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवून अपात्र ठरवले त्यामुळे लोकशाहीचे भवितव्य, विरोधी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घटनात्मक संस्थांच्या अस्तित्व बाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्यावेळी वडगाव सावताळचे चेअरमन दादाभाऊ रोकडे, वडगाव सावताळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानदेव रोकडे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अनिकेत पाचपुते, विजय रोकडे, दादाभाऊ शिंदे, सुनील रोकडे, गंगाराम व्यवहारे, गणेश रोकडे, राधुजी शिंदे, बाळू नरवडे, प्रसन्न रोकडे, संतोष रोकडे,संदीप व्यवहारे, प्रदीप रोकडे, तुकाराम साळुंके, विठ्ठल खंडाळे, अशोक शेवनते, गुलाब केदारी, तुकाराम रोकडे, शिवा भनगडे,सूर्यभान शिंदे् सतीश तिखोळे किसन रोकडे, बाळू रोकडे, शंकर चौरे,विशवनाथ रोकडे, सीताराम रोकडे, देवराम शिंदे, दत्तात्रय शिंदे,कुंडलिक जाधव, विठ्ठल जाधव, नामदेव वाव्हळ व अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते.
COMMENTS