विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या पदाधिकार्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट सुपा | नगर सह्याद्री निस्वार्थीपणे केलेली समाज सेवा, देश सेवा वेग...
विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या पदाधिकार्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
सुपा | नगर सह्याद्रीनिस्वार्थीपणे केलेली समाज सेवा, देश सेवा वेगळाच आनंद देऊन जाते. जिवानाचे ध्येय निश्चित केले तर मरणालाही जिंकता येते. अथक परिश्रम करण्याची तयारी आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचे ध्येय साध्य केले असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे यांनी पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या पदाधिकार्यांशी संवाद साधताना केले.
विश्वकर्मा गृपचे जेष्ठ अधिकारी आनंद वैद्य, पंडीत गर्जे लेखक साहित्य इतिहास अभ्यासक दुर्ग सेवक संदीप तापकिर, सुरेंद्र शिंदे यांनी नुकतीच राळेगण सिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याची भेट घेतली. यावेळी अण्णा म्हणाले शुद्ध आचार, शुद्ध विचार, जिवन निष्कलंक, जिवनात त्याग करण्याची तयारी व अपमान पचवाण्याची तयारी ठेवाली तर तुम्ही खुप काही करु शकता मी आयुष्यभर या पंचसुत्रीला धरुन काम केले. जीवनाचे ध्येय निश्चित करून मरणाची तयारी ठेवून निष्काम भावनेने कार्य केले तर एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा ज्याच्या जवळ धन दौलत नाही असा कार्यकर्ता गाव समाज देशासाठी मोठे काम करु शकतो असे अण्णा यांनी सांगितले.
यावेळी आंनद वैद यांनी विश्वकर्मा गृप विद्यार्थी, समाज हितासाठी खुप चांगले उपक्रम राबवत असुन हे सर्व आपल्या प्रेरणेतुन करत आहोत अण्णा तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात तुम्हीच आमचे बापु आहेत तुमच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत. आज राळेगण पाहुन तुम्ही बनवलेली ग्राम विकासाची पंढरी जगासाठी आदर्श आहे. असेही वैद आवर्जून म्हणाले. विश्वकर्माच्या टिमने श्री संत यादवबाबा मंदीर तेथील अण्णा हजारे रहात आसलेली खोली, निळोबाराय विद्यालय, मिडीया सेंटर, पद्मावती बन व आंदोलन सग्रांहालय यांना भेट दिली. एका अत्यंत छोट्या खेड्याला अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या नकाशावर झळकवले असे गौरव उदगार विश्वकर्माच्या टिमने व्यक्त केले. आंनद वैद्य पंडीत गर्जे, संदिप तापकीर यांनी अण्णा हजारे यांना ऐतिहासिक पुस्तक, महालक्ष्मी मातेची प्रतिमा, शाळ व श्रीफळ देऊन सन्मानीत केले. पंडीत गर्जे यांनी परिचय करुन देत भेटीचा उद्देश सांगितला. सुरेंद्र शिंदे यांनी मान्यवराचा परिचय करुन दिला तर साहित्यिक संदीप तापकिर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
COMMENTS