पारनेर | नगर सह्याद्री नैसर्गिक शेतीमध्ये विषमुक्त अन्न प्रयोग केल्यामुळे नांदूर पठारच्या किसान प्रोड्युसर कंपनीला पाणी फौंडेशनचा १ लाखाचा ...
पारनेर | नगर सह्याद्री
नैसर्गिक शेतीमध्ये विषमुक्त अन्न प्रयोग केल्यामुळे नांदूर पठारच्या किसान प्रोड्युसर कंपनीला पाणी फौंडेशनचा १ लाखाचा तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिक २५ लाख रु. द्वितीय पारितोषिक १५ लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक १० लाख रुपये तसेच तालुयात प्रथम येणार्यास १ लाख रुपये अशी बक्षीस रचना आहे. सदर स्पर्धेकामी पानी फाउंडेशनचे तांत्रिक सल्लागार संदेश कारंडे, जिल्हा समन्वयक विक्रम पाठक, तालुका समनवयक अभिजित गोडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास नांदूर पठार चे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, नांदूर पठार किसान प्रोड्यूसर कंपनी चे सभासद उपस्थित होते.
सत्यमेव जयते फार्मर कप २०१२ मध्ये तालुका स्तरीय पुरस्कार जिंकल्याबद्दल आपले अभिनंदन, गट म्हणून एकत्र येऊन, एसओपीचे पालन करून तुम्ही केलेले उत्कृष्ट काम अनेक शेतकर्यांना गट शेती करण्यास प्रेरित करेल, नैसर्गिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती वापरून विषमुक्त अन्न पिकवण्याची तुमची मेहनत खरच कौतुकास्पद आहे. तुमच्यातील शेतीचे तुम्ही अँड अॅम्बॅसेंडर व्हाल याची आम्हाला खात्री पाणी फौंडेशनने व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध सिने अभिनेते अमीर खान यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या पानी फाउंडेशन च्या फार्मर कप २०२२-२३ मध्ये सोयाबीन पिकाच्या स्पर्धेत नांदूर पठार येथील नांदूर पठार किसान प्रोडयुसर कंपनी ली. ने जोरदार मुसंडी मारली आहे. २०० गुणाच्या या स्पर्धेत नांदूर पठारने आजपर्यंत १९० गुण मिळवले असून १० गुण निवड मंडळाच्या माध्यमातून मिळणार आहेत. सदर स्पर्धेमुळे शेतकर्यांच्या ज्ञानात व उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. पानी फाउंडेशनने शेतकर्यांसाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया बीबीएफ पद्धतीने पेरणी दशपर्णी अर्क फवारणी उन्हामध्ये नांगरणी इ. विविध शेती करण्याच्या पद्धती अंमलबजावणी केली. म्हणून शेतकर्यांच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली. सोयाबीन चे पूर्वी एकरी ४ ते ५ क्विंटल मिळणारे उत्पन्न या वर्षी एकरी १५ ते १६ क्विंटल वर गेले. त्याचप्रमाणे एकत्रित बियाणे खरेदी, इर्जिक, सामूहिक विक्री, एकत्रित नांगरणी, पेरणी यामुळे शेतकर्यांच्या खर्चात प्रचंड प्रमाणत बचत झाली.
नांदूर पठार च्या या कार्याची दखल एका वृत्तवाहिनेने ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमात दोन वेळा नांदूर पठारचे सदर गटाचे भाग दाखविण्यात आले. तसेच पानी फाउंडेशन चे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शन खाली नुकतीच अमेरिकेतील ऑरेगण युनिव्हर्सिटीचे प्रमुख अँड्र्यू मिल्सन यांनी नुकतीच नांदूर पठारला भेट दिली. सदर युनिव्हर्सिटी पृथ्वी वाचविण्यासाठी पर्यावरण या विषयावर शिक्षण देते. त्यांनी नांदूर पठारच्या पानी फाउंडेशन माध्यमातून झालेल्या जल संधारण कामांची व विविध पिकांची पाहणी केली. नांदूर पठारचे कार्य पर्यावरण संवर्धनासाठी दिशादर्शक असल्याचे आणि आंतर राष्ट्रीय स्तरावर अभ्यासासाठी एक फिल्म बनवणार असल्याचे अमेरिकन पाहुण्यांनी नमूद केले.
COMMENTS