श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव या ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा झाला असून शेतकरी पुरता हैराण झाला आहे त्य...
श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव या ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा झाला असून शेतकरी पुरता हैराण झाला आहे त्यामुळे शेतकरी महावितरणच्या कर्मचार्यांच्या निषेधार्थ नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने लेखी दिल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव या ठिकाणी वीज टिकत नसल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतातील पिके जळायला लागली आहेत पाणी उपलब्ध असतानाही विजेमुळे शेतीला देता येत नाही. ही परस्थिती मागील ३ वर्षांपासून असून यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही. घुगलवडगाव येथे गेल्या ६ महिन्यांपासुन दिवसा आड थ्री फेज लाईट असुन सिंगल फेजची लाईट देखील नसते. वसुलीच्या नावाखाली पुर्ण घुगवडगावची लाईट कोणालाही कल्पना न देता बंद केली जाते.उप कार्यकारी अभियंता डोळे हे शेतक-यांना व विज ग्राहकांना वेठीस धरत असुन डोळे यांच्या कार्यकाळातील सर्व कामकाजाची चौकशी मंत्रालय स्तरावरील महावितरणाच्या वरीष्ठ अधिका- र्यांमार्फत व्हावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात उप कार्यकारी अभियंता डोळे याना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, सरपंच मिलिंद कदम, रवींद्र गलांडे, गोपीचंद दांगडे, कैलास दांगडे, सुनील पवार, गौतम दांगडे, रोहिदास दांगडे, पोपट गलांडे, साहेबराव लोखंडे, कैलास चव्हाण, बापू पाचपुते, बाळासाहेब पवार, दादा ननवरे, बाळासाहेब पाचपुते, आबा चव्हाण, महेश पवार, सुधीर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS