पारनेर | नगर सह्याद्री कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पुकारलेल्या संपास पारनेर तालुयात मोठा प्रतिसाद मिळाला असून सर्...
पारनेर | नगर सह्याद्री
कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पुकारलेल्या संपास पारनेर तालुयात मोठा प्रतिसाद मिळाला असून सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. पंचायत समितीत तालुका समन्वय समितीने ठिय्या आंदोलन केले. या संपामुळे विविध कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
पारनेर तालुयातील माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, आरोग्य विभाग, सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी, बांधकाम आदी विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. गट विकास अधिकारी किशोर माने यांनी संपाला राजपत्रित अधिकारी महासंघाचा संपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढू परंतु संपात खंड पडून देणार नाही.समन्वय समितीने घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा असून तोपर्यंत कोणीही कामावर हजर होऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. सरकार उलथून टाकण्याची ताकद कर्मचार्यांमध्ये असून कर्मचार्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन सर्व संघटनांनी केले. दहावी व बारावीचा पेपर असल्याने त्यासाठी लागणारे कर्मचारी फक्त उपस्थित होते. तेही कर्मचारी पुन्हा संपात परतणार असून सर्व कर्मचारी सक्रियपणे संपात सहभागी राहणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
यावेळी शिक्षक नेते प्रवीण ठुबे, गोकुळ कळमकर, शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर, शिक्षक नेते संभाजी औटी, दिलीप भालेकर, अमोल साळवे, आबासाहेब गायकवाड, कानिफ गायकवाड, सोपान गवते, संतोष खोडदे, नारायण बाचकर, संदीप शिंदे, भगवान राऊत, अमोल ठाणगे, गौतम साळवे, बाबासाहेब धरम, चंद्रकांत मोढवे, चंद्रकांत गट, संतोष खामकर, प्रवीण साळवे, बबन दरेकर आदी उपस्थित होते.
रामदास स्वामी शिक्षण संस्था
आणे व कर्मचार्यांचा निषेध!
शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, रांजणगाव व अंचलेश्वर विद्यालय, गांजीभोयरे हे दोनच विद्यालय सुरू होते. या संस्थेचा व कर्मचार्यांचा संपात सहभाग नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध करण्यात आला.
संप १०० टक्के यशस्वी
पारनेर तालुयात कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी कार्यरत असलेल्या १२०८ कर्मचार्यांपैकी १११६ कर्मचार्यांनी सक्रिय संपात सहभाग घेऊन संप शंभर टक्के यशस्वी असल्याचे दर्शवले आहे.
संपामुळे शुकशुकाट
तालुयातील शाळा, कॉलेज सोबतच पंचायत समिती, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, लघुपाटबंधारे या सर्व विभागात कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे शुकशुकाट होता.
COMMENTS