अहमदनगर | नगर सह्याद्री स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पेस ऑलिम्पियाड सारख्या परिक्षा या आत्मविश्वास देणार्या आहेत.हिंद सेवा मंडळाने र...
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पेस ऑलिम्पियाड सारख्या परिक्षा या आत्मविश्वास देणार्या आहेत.हिंद सेवा मंडळाने राज्यात मोठा नावलौकिक मिळवला असल्याने स्पेस ऑलिम्पियाड परिक्षेचे सर्टिफिकेट असणार्या विद्यार्थ्याला राज्यात कोणत्याही महाविद्यालयात सहज प्रवेश मिळू शकेल. स्पेस ऑलिम्पियाड ही वेगळा दर्जा असणारी परिक्षा विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारी परिक्षा आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची ओळख व्हावी या उद्देशाने पेमराज सारडा महाविद्यालय व शांतीकुमार फिरोदिया मेमोरीयल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात स्पेस ऑलिम्पियाड जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेचे परितोषिक वितरण सावेडीच्या माउली सभागृहात आ. संग्राम जगताप व माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, परिक्षा प्रमुख सुमतिलाल कोठारी, फिरोदिया फाउंडेशनचे अधिकारी श्री. घाणेकर, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अभय आगरकर म्हणाले, ज्या संस्थेला व्हिजन असते ती संस्था कायम पुढे जात असते. हिंद सेवा मंडळ ही अग्रगण्य संस्था कायम विविध उपयुक्त शैक्षणिक उपक्रम राबवणारी व्हिजन असलेली संस्था आहे. शिक्षण क्षेत्रात आता खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत स्पेस ऑलिम्पियाड सारख्या परिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. आयआयटी, जेईई परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना परिपक्व करणारी ही परिक्षा आहे.प्रा.शिरीष मोडक म्हणाले, पहिल्याच वर्षी स्पर्धेला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता येणार्या शैक्षणिक वर्षात ही परिक्षा राज्यपातळीवर नेण्याचा संस्थेचा मानस आहे. सुमतिलाल कोठारी म्हणाले, पूर्ण जिल्ह्यातून विविध शाळांचे सुमारे दोन हजार विद्यार्थी यात सहभगी झाले होते. अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही परिक्षा घेण्यात आली.
सारडा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही टिप्स दिल्या. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी सारडा महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भावना वैकर, प्रा.प्रसाद बेडेकर व प्रा.संध्या बडवे यांनी केले. पर्यावेक्षक प्रा.स्मिता भुसे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, रणजीत श्रीगोड, सुहास मुळे, दामोदर बठेजा, संजय छल्लारे, बी.यू.कुलकर्णी, योगेश देशमुख, कल्याण लकडे, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, डॉ.मिलिंद देशपांडे, प्रा,गिरीश पाखरे आदी उपस्थित होते.स्पेस ऑलिम्पियाड परिक्षेचा सविस्तर निकाल- प्रथम- दिग्विजय गायकवाड,( रु.२१ हजार व करंडक), द्वितीय- सुजल लटके (सेंट विवेकानंद स्कूल), (अकरा हजार व करंडक), तृतीय- निसर्ग वायकर (श्री समर्थ विद्या मंदिर),(सात हजार व करंडक). उत्तेजनार्थ राजेश्वर कोकाटे, श्वेता जाधव, विश्वजीत बांदल, प्रतिक कदम, ईश्वरी आंधळे, वैष्णवी तरटे, अक्षत कोठारी, श्रावणी खेडकर, संस्कार गिरवले व अनुजा कदम. बेस्ट मुख्याध्यापक अनिल लोखंडे (प्रवरा कन्या विद्या मंदिर), उल्हास दुगड ( भा.फी.हायस्कूल) व संतोष झोटिंग (प्रवरा इंग्लिश स्कूल).
COMMENTS