मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात ६०...
मुंबई -
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात ६०० कोटींचा पल्ला पार केला आहे. जगभरात १ हजार कोटींचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान त्याला हॉलिवूड पदार्पणाविषयी विचारण्यात आले होते.
यावेळी त्याने हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड खूप बरे असल्याचे त्याने म्हटले आहे. शाहरुखच्या हॉलिवूड पदार्पणावर आता प्रियंका चोप्राने आपले परखड मत मांडले.
मध्यतरींच्या काळात प्रियंकाने २०१९ मध्ये 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटात काम केले होते. २०१६ पासून प्रियांका हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि तिने हॉलिवूडला अनेक चित्रपट आणि अनेक वेबसीरिज दिल्या आहे. प्रियांकाने 'बेवॉच' या वेबसीरिजमध्ये काम केले आणि तिचे नशीबच पालटले. या वेबसीरिजनंतर आपल्या अभिनयाचा डंका जगभरात गाजवला.
शाहरुखच्या हॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल प्रियंका एका मुलाखतीत म्हणते, “ एकाच ठिकाणी थांबणे मला आवडत नाही. मला या गोष्टीचा गर्व नाही तर विश्वास आहे. जेव्हा मी सेटवर जाते, तेव्हा मला कळते की मी काय करत आहे, माझे काम कसे चालू आहे याबद्दल कळते. एका देशातल्या माझ्या यशाचं ओझं मी दुसऱ्या देशात नेत नाही.
प्रियांका चोप्रानेही शाहरुख खानसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले असून दोघांमध्ये चांगली मैत्री होती. शाहरुख आणि प्रियांकाने 'डॉन 2' आणि 'बिल्लू'मध्ये एकत्र काम केले होते. प्रियांकाच्या 'सिटाडेल'बद्दल बोलायचे तर, ती वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. यात लेस्ली मॅनव्हिल आणि स्टॅनले टुसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
COMMENTS