नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे लोकार्पण अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहराचे विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्...
नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे लोकार्पण
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहराचे विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांना बरोबर घेऊन नगर शहराच्या विकासाची गुढी आपण सर्वजण मिळून उभारू, विकास कामांचे दिलेले शब्द पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी विकास कामे करण्यासाठी चांगल्या विचाराची लोक निवडून दिली पाहिजे प्रभाग क्रमांक १ चे चार ही नगरसेवकांना विकासाचे व्हीजन आहे. ते प्रभागाचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवीत आहे. लेखानगर मधील दत्त मंदिर परिसरातील ओपन पेस शिशुवीकरणाचे काम मार्गी लागले आहे. नगर शहरातील एका-एका भागातील विकासाचे कायमस्वरूपी चे प्रश्न मार्गी लावली जात असल्याचे समाधान मिळत आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नगरसेविका दिपालीताई बाळासाहेब बारस्कर यांच्या प्रयत्नातून लेखानगर मधील श्री दत्त मंदिर ओपन स्पेस, जॉगिंग ट्रॅक व वृक्षरोपण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉटर सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, शिवाजी चव्हाण, सतीश ढवण, शैलेश बांगर, अनिल गाडेकर, अंकुश चत्तर, अतुल कुदनर, किरण बारस्कर, सरोदे बोरकर, सुपेकर, काकडे, बोरुडे, गोसावी आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक दिपालीताई बारस्कर म्हणाले की तपोवन रोड परिसराच्या विकास कामांना आमदार संग्राम जगताप यांनी गती दिली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे नागरिक वसाहती झपाट्याने विकसित होत आहे. तपोवन रोड परिसरात भविष्य काळामध्ये मोठी बाजारपेठ निर्माण होईल. प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध आहे. प्रभाग क्रमांक एक नव्याने विकसित होणारे आहे. नागरी मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान असते. तपोवन रोड ला जोडणारा एकविरा चौक या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. असे त्या म्हणाल्या शैलेश बांगर प्रस्तविकात म्हणाले की लेखा नगर परिसराची तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी स्थापना झाली होती आता या भागातील विकास कामे पाहून मनाला आनंद होत आहे. नगरसेविका दीपालीताई बारस्कर यांनी श्री दत्त मंदिर परिसरातील ओपन स्पेसचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, वृक्षारोपण आदी विकासाची कामे पूर्ण झाली आहे. श्री दत्त मंदिर हे या भागातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसराचे सुशोभी करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आता ते काम पूर्ण झाले आहे. असे ते म्हणाले. यावेळी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर नगरसेवक, डॉटर सागर बोरुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार आदींची भाषणे झाली.
COMMENTS