संगमनेर | नगर सह्याद्री संगमनेर शहरात सर्वात जुनी १९७० साली स्थापन झालेल्या परंतु संस्थेमध्ये सभासद वादामुळे गेल्या पाच वर्षापासून प्रशासक अ...
संगमनेर | नगर सह्याद्री
संगमनेर शहरात सर्वात जुनी १९७० साली स्थापन झालेल्या परंतु संस्थेमध्ये सभासद वादामुळे गेल्या पाच वर्षापासून प्रशासक असलेल्या संगमनेर हातमाग विणकर सहकारी हाउसिंग सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील मादास तर व्हाईस चेअरमनपदी पापया शिरसुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासद वाद निर्माण झाला होता. त्याकारणाने गेल्या पाच वर्षापासून उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने आर.बी.वाकचौरे या सहकारी अधिकार्यांनी संस्थेचे कामकाज पारदर्शक पणे सांभाळले. सदर प्रशासक यांनी या संस्थेच्या सर्व सभासदांची कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करून सर्व सभासद असल्याबाबतची खात्री करून सभासद यादी तयार केली. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या नियम कायद्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणूक प्रक्रियेत १५ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु त्यातील ६ सभासदांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ९ उमेदवारांची निवड सर्व सभासदांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करून त्या सर्वांची बिन विरोध निवड झाल्याचे घोषित केले. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान एका सदस्याने हरकत घेत उच्च न्यायालय औरंगाबाद येथे निवडणूक रद्द होणे बाबत याचिका दाखल केली परंतु सदर व्यक्तीकडे इतर सभासद सभासदांचा प्रबळ आधार नसल्याने त्यांनी स्वतःहून याचिका मागे घेतली आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.
यात सुनील मादास, पापाया शिरसुल्ला, अरविंद पगडाल, चंद्रकांत एनगंदूल, लक्ष्मीनारायण मुशम, बलराम श्रीगादी, राजेंद्र बुरा तसेच महिला सदस्य म्हणून भारती कोम्पेल्ली,तुळजा श्रीराम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, जयश्री थोरात यांनी अभिनंदन केले. सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड प्रसंगी शिक्षक नेते हिरालाल पगडाल, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष गणेश मादास, चंद्रशेखर झुंजूर, नारायण ईटप, शांताराम आडेप, प्रकाश झुंजूर, नारायण इटप, शांताराम आडेप, प्रकाश झुंजुर, जनार्दन एनगंदूल, नारायण दासरी, राम चन्ना, अनिल अनलदास, अजय श्रीपतवाड, काशिनाथ आडेप, विनोद झुंजुर,
नरेंद्र आडेप, अंबादास आडेप, प्रकाश वन्नम, शंकर गुन्देट्टी, महिला अध्यक्षा कविता शिरसुल्ला, कल्पना एनगंदूल, आशा झुंजुर, पुष्पा झुंजुर, शितल मादास, रेखा मादास, शामला श्रीगादी, मीनाक्षी श्रीपतवाड, राम शिरसुल्ला, श्याम शिरसुल्ला, रवींद्र उडता, विकास रच्चा, बाबू अमृतवाड, संतोष अंकारम, सुधाकर आडेप, महेश वासलवार, पांडुरंग आनंदम, गिरीश आडेप, पवन पाचकंटी, श्रीकांत झुंजुर, पांडुरंग आडेप, राजेंद्र श्रीराम यांची उपस्थिती होती.
COMMENTS