मुंबई : ’पुष्पा’ चित्रपटानंतर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना जगभरात प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटातील ’सामी-सामी’ हे गाणं टॉपमध्ये डान्सिंग नंबर्...
मुंबई : ’पुष्पा’ चित्रपटानंतर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना जगभरात प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटातील ’सामी-सामी’ हे गाणं टॉपमध्ये डान्सिंग नंबर्समध्ये समाविष्ट आहे. रश्मिका मंदान्नाच्या ’पुष्पा’नंतर प्रेक्षक चित्रपटाच्या दुसर्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रश्मिका मंदान्ना ’पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनसोबत पुन्हा दिसणार आहे. ’पुष्पा २’ चा टीझर यावर्षी ८ एप्रिलला अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणार आहे.या चित्रपटाशिवाय रश्मिका दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ’अॅनिमल’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ’पुष्पा: द राइज’ हा २०२१ मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे त्यानंतर रश्मिका प्रत्येक अवॉर्ड शो आणि कार्यक्रमात सामी-सामी गाण्यावर नाचताना दिसली. मात्र, आता या गाण्यावर डान्स करण्यास नकार देत असं करण्या मागचं कारणही सांगितलं आहे. खरंतर, अलीकडेच ट्विटरवर एका चाहत्याने रश्मिका मंदानाला त्याच्यासोबत ’सामी सामी’वर डान्स करण्याची विनंती केली, अभिनेत्रीने लगेच असं करण्यास नकार दिला. रश्मिका म्हणाली-’मी आता जास्त सामी सामीवर जास्त डान्स केला तर म्हातारपणात मला पाठदुखी होईल. रश्मिकाने चाहत्याला विचारलं, ’तुला मला अस्वस्थ बघायचे आहे का? म्हणूनच आम्ही जेव्हाही भेटू तेव्हा आम्ही कोणत्यातरी दुसर्या गाण्यावर नाचू. आता रश्मिकाचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
COMMENTS