मुंबई - अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. ...
मुंबई -
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिचे चाहते कायमच तिच्या चित्रपटांबाबत उत्सुक असतात मात्र एका चाहत्याने थेट तिला खासगी प्रश्न विचारला आहे त्यावर अभिनेत्रीनेदेखील त्याला प्रतिसाद दिला आहे.
समांथा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. चाहत्यांच्या कायमच संपर्कात राहत असते. ट्वीटवर एका चाहत्याने तिचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्याकडे मागणी केली आहे की “कृपया कोणाला तरी डेट कर, मी योग्य नाही तरीपण” असा कॅप्शन त्याने दिला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती असं म्हणाली, “तुझ्यासारखं कोण प्रेम करेल माझ्यावर” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तिच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
नागा चैतन्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतःला सावरले आहे. त्यानंतर चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करत होती. अशातच तिला ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराचं निदान झाले. यामुळे तिच्या अडचणी वाढल्या. ती पुन्हा भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागली. अशा परिस्थितीतही समांथा स्वतःला सांभाळत तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.
दरम्यान शाकुंतलम हा तिचा आगामी दाक्षिणात्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असणार आहे. तसेच ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज आणि डीके हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या ती या वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
Who will love me like you do 🫶🏻 https://t.co/kTDEaF5xD5
— Samantha (@Samanthaprabhu2) March 26, 2023
COMMENTS