पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समाजल्या जाणार्या पळसपुर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रूपाली श्रीकांत...
तालुयातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समाजल्या जाणार्या पळसपुर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रूपाली श्रीकांत वाघमारे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.
पळसपुर ग्रामपंचायतची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली होती. श्रीकांत खंडू वाघमारे यांनी आतापर्यंत गावामध्ये अनेक प्रकारची कामे करून गरीब व अशिक्षित व्यक्तींना सातत्याने शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन करणे मदत करणे या कार्यामुळेच पळसपुर गावातील ग्रामस्थांनी त्यांची पत्नी रूपाली वाघमारे यांना बिनविरोध सरपंचपदी निवडून दिले. निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बिनविरोध पार पडली.तालुयामध्ये मोठ्या गावातील ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकतात व त्या माध्यमातून गाव एकत्र येऊन विकासाची कामे होऊ शकतात हा आदर्श निर्माण झाला आहे. सर्वच राजकीय पदाधिकार्यांनी विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.निवड बिनविरोध करण्यासाठी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, गोरख आहेर, उपसरपंच ठका डोंगरे, सुनिता आहेर, सुरेखा आहेर, माजी सरपंच सुवर्णा आहेर, मनोज शिंदे, हनुमंत पवार अर्चना आहेर, संदीप आहेर, माधवशेठ पवार, किसन आहेर गुरुजी, रामदास ढोले व इतरांनी सहकार्य केले.
COMMENTS