निघोज | नगर सह्याद्री शिंदे-फडणवीस सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच वाळू वि...
शिंदे-फडणवीस सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच वाळू विक्री करण्यासाठी व घरपोहोच मिळण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे सर्वत्र स्वागत होत असून नामदार विखे पाटील यांनी वाळूतस्करी रोखण्यासाठी जी भुमिका घेतली ती योग्य असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहे.
वाळूतस्करीमुळे ओढे,नाले नदी पुर्णपणे पोखरल्या असून तरुण मुले मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाले आहेत. वाळुतस्करांच्या दहशतीमुळे वातावरण पुर्णपणे बिघडले होते. मात्र गेल्या सहा महिन्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळुतस्करी रोखण्यासाठी कडक भुमिका घेतली. बहुतांश ठिकाणी वाळु तस्करीला पायबंद बसला आहे. तशातच वाळु विक्री करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यांच्या या भुमिकेचे ग्रामीण भागातील जनतेने स्वागत केले असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
COMMENTS