नवी दिल्ली - ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्का...
नवी दिल्ली -
ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. या खटल्यात न्यायालयाने संजय राऊत यांनाही समन्स बजावले आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे.
COMMENTS