अहमदनगर | नगर सह्याद्री दि अहमदनगर मर्चटस् बॅकेच्या स्टाफ संचालकपदी प्रसाद विनोद गांधी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मामा आनंद मुथा...
दि अहमदनगर मर्चटस् बॅकेच्या स्टाफ संचालकपदी प्रसाद विनोद गांधी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मामा आनंद मुथा, विक्रम मुथा, प्रसन्न मुथा यांनी या भाच्याचा सत्कार करून बॅकेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आजोबा सतीश मुथा यांनीही नातवाचा सत्कार करत शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या सत्कार सोहळ्यात बोलताना आनंद मुथा म्हणाले, अर्थतज्ज्ञ हस्तीमल मुनोत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रगतीची घौडदौड करत असलेल्या मर्चंटस् बॅकेच्या स्टाफ संचालकपदी भाचे प्रसाद गांधी यांची एकमताने निवड झाली, खुप आनंद झाला. स्टाफ संचालकपदी मिळालेल्या या संधीचे प्रसाद गांधी सोनेच करतील. आपली निवड सार्थ असल्याचे ते कृतीमधून दाखवून देतील, असा विश्वासही आनंद मुथा यांनी व्यक्त केला.सत्कारास उत्तर देताना प्रसाद गांधी म्हणाले, बॅकेचे प्रशासकीय अधिकारी, संचालक मंडळ आणि कर्मचारीवृंदांच्या सहकार्याने बॅकेचे कार्य करत वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करेल. कर्मचारीवृंदांचे प्रश्न संचालक मंडळासमोर ठेवून ते प्राधान्याने सोडवून घेईल.विक्रम मुथा, प्रसन्न मुथा, अनुप मुथा यांनीही भाच्यास शुभेच्छा दिल्या. आजोबा सतीश मुथा यांनी आशीर्वाद देत बॅकेचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या शनीशिंगणापूरने मामा-भाच्याच्या नात्याचे महत्व सर्वांसमोर ठेवले. बॅकेच्या कार्यासाठी मामांनी केलेला भाच्याचा सत्कार सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
COMMENTS