निघोज | नगर सह्याद्री लोकनेते आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यां...
लोकनेते आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांना देवीभोयरे येथे आणून व त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करीत गावकर्यांना आनंद मिळवून दिला असून पवार यांची देवीभोयरे भेट हा सुवर्णक्षण आम्ही कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया अंबिका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.
आमदार नीलेश लंके यांनी गेल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात देवीभोयरेसारख्या छोट्या गावाला दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे दिली असून पवार यांच्या हस्ते सहा कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. लोकसहभागातून बांधलेल्या भव्य प्रवेशद्वार तसेच अंबिका माता देवस्थान ट्रस्ट नामफलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा देवीभोयरे ग्रामस्थांच्या दृष्टीने सुवर्णक्षण असून हा सोनियाचा दिवस केवळ आमदार लंके यांच्या मुळे पहाण्याचे भाग्य ग्रामस्थांना लाभले आहे. राष्ट्रीय नेते, देशाचे जाणते राजे आणी महाराष्ट्राचे भूषण म्हणून आज त्यांची प्रतिमा जगात आहे. पवार यांनी राजकारणात व समाजकारणात सक्रिय राहून गेली पन्नास ते साठ वर्षांत देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी कृषी मंत्री म्हणून काम करताना शेतकर्यांना ७५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल याप्रमाणे सर्वाधिक योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. अशाप्रकारे त्यांचा नावलौकिक जगात आहे. त्यांनी अंबिका नगरीत देवीभोयरे गावी येऊन आम्हाला धन्य केले आहे. आम्हाला त्यांच्या सत्काराचे भाग्य लाभले यासारखी दुसरी गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत जाधव यांनी आमदार नीलेश लंके यांचे आभार मानले आहेत. यावेळी देवीभोयरे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS