राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेंचा भाजपावर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री स्व. उदयराव शेळके यांच्या अकाली निधनामुळे जिल्हा सहकारी ब...
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेंचा भाजपावर हल्लाबोल
स्व. उदयराव शेळके यांच्या अकाली निधनामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी गीतांजर्ली शेळके यांची नियुक्ती करा असे निवेदन देणार्या भाजपाच्या तालुयातील नेत्यांना शेळके कुटुंबियांच्या सहकारातील योगदानाची आठवण आज झाली का?भाजपा नेत्यांचे हे प्रेम हे पुतना मावशीचे असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष तरटे म्हणाले, शेळके कुटुंबियांचे सहकारातील योगदान सर्वश्रुत आहे. त्याचीच दखल घेत त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपदावर काम करण्याची जाणीवपूर्वक संधी देण्यात आली होती. संचालक म्हणूनही त्यांनाच संधी देण्यात येत होती. स्व. गुलाबराव शेळके यांनाही मुंबई बँक तसेच आशिया खंडातील सर्वात मोठया राज्य सहकारी बँकेचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. अलिकडेच निघोजच्या दौर्याप्रसंगी खा. पवार यांनी स्व. गुलाबराव शेळके, स्व. उदयराव शेळके यांच्या सहकारातील कामाचा आवर्जुन गौरव केला होता.माजी मंत्री दिलीप वळसे यांच्या सुचनेनुसार आ. निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आपण स्वतः, अशोक सावंत तसेच जिल्हयातील प्रमुख पदाधिकार्यांच्या यापूर्वीच झालेल्या बैठकीत शेळके यांच्या कुटूंबियांनाच संचालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र त्याबाबत पत्रकबाजी करण्याची आवश्यकता आम्हाला भासली नाही. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या जागेवर त्याच कुटूंबातील सदस्याला संधी देण्याचा प्रघात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात आहे.स्व. उदयराव शेळके यांच्या अकाली निधनामुळे शेळके कुटुंबियांवर दुःखद प्रसंग ओढावला आहे. त्या दुःखातून सावरून हे कुटूंब पुन्हा समाजकारणात, राजकारणात येईल. गीतांजली शेळके या समाजकारण तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजात उत्तम कामगिरी करतील अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला खात्री आहे. अशा स्थितीत कोणीही राजकारण करणे अजिबात योग्य नसल्याचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे म्हणाले.
तरीही विरोधात उमेदवार का दिला ?जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत उदयराव शेळके हे एकतर्फी विजयी होतील असे चित्र होते ते एकतर्फीच विजयी झाले. विविध तालुयातील संचालक बिनविरोध विजयी होत असताना पारनेरमध्येही उदय शेळके यांच्यासाठी निवडणूक एकतर्फी असताना विरोधकांनी उमेदवार का दिला असा सवाल तरटे यांनी केला. शेळके कुटूंबियांचे योगदान लक्षात घेऊनच शरद पवार यांनी उदयराव यांना चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली होती याचीही आठवण तरटे यांनी विरोधकांना करून दिली आहे.
COMMENTS