दिलीपराव ठुबे यांच्या स्मरणार्थ पारनेर रोड मित्रमंडळाच्यावतीने भव्य स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा कान्हूरपठार | नगर सह्याद्री कान्हूर पठार पत...
दिलीपराव ठुबे यांच्या स्मरणार्थ पारनेर रोड मित्रमंडळाच्यावतीने भव्य स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा
कान्हूरपठार | नगर सह्याद्री
कान्हूर पठार पतसंस्थेचे माजी कार्यकारी संचालक स्व.दिलीपराव ठुबे यांच्या स्मरणार्थ पारनेर रोड मित्रमंडळाच्यावतीने आयोजित भव्य स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५१,००० रूपयांचे पारितोषिक ओतुरच्या कॅट वे संघाने जिंकले. हे पारितोषिक कान्हूर पठार पतसंस्था सेवक वृंद यांच्यावतीने देण्यात आले होते.
द्वितीय क्रमांकाचे ३१,००० रूपयांचे पारितोषिक शिरूरच्या संकल्प इलेव्हन पोलिस या संघाने जिंकले. हे पारितोषिक भगवान वाळुंज व अशोक ठुबे यांच्यावतीने देण्यात आले होते.तृतीय क्रमांकाचे २१,००० रूपयांचे पारितोषिक मंचरच्या संकल्प प्रतिष्ठान या संघाने जिंकले. हे पारितोषिक संभाजी ठुबे, अनिल ठुबे, लहानू ठुबे यांच्यावतीने देण्यात आले होते. चतुर्थ क्रमांकाचे ११,००० रूपयांचे पारितोषिक अवसरी येथील स्व.कांतारामबापू हिंगे स्पोर्ट्स या संघाने जिंकले. हे पारितोषिक नितीन भागवत यांच्यावतीने देण्यात आले होते. सर्व विजयी संघांना संपत खरमाळे यांच्यावतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेसाठी एस.के स्पोर्ट्स, अष्टविनायक बोअरवेल, सन्मान ग्राफिस, गोविंदा साऊंडस्, ए ण्ड सी फोटोग्राफी, शुभम कोठारी, मंगेश खोसे, सुजय ठुबे, वैभव ठुबे, किरण शेळके, स्वप्निल सोमवंशी, दादाभाऊ नवले, अमित खिलारी, बबन व्यवहारे, प्रवीण व्यवहारे, राहुल व्यवहारे, गोकुळ चिर्के यांचे विशेष सहकार्य लाभले.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कान्हूर पठार येथे पार पडला. याप्रसंगी कान्हूर पठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशिला ठुबे, कार्यकारी संचालिका नमिता ठुबे, व्हा.चेअरमन पी.के.ठुबे, संचालक सुहास शेळके, भोमा ठुबे, भास्कर ठुबे, भगवान वाळुंज, दादाभाऊ नवले, संपत खरमाळे, मंगेश गागरे, एस.पी.ठुबे, बबन झावरे, संजय ठुबे, किरण ठुबे, अर्जुन नवले, ड.प्रसाद शेळके, संदीप ठुबे, सचिन ठुबे, नितीन भागवत, लहानू शेळके, शिवाजी ठुबे, दत्ता ठुबे, रशिद इनामदार, साहेबराव नवले, रमेश नवले, राघू वाळुंज शुभम ठुबे, पप्पू ठुबे, स्वप्निल खोसे, ओंकार ठुबे, विकास ठुबे, कार्तिक ठुबे, वैभव ठुबे, अनिकेत ठुबे, दिपक ठुबे, नयन ठुबे, तेजस ठुबे, अभिषेक ठुबे, पंकज पावडे उपस्थित होते.
COMMENTS