जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याकडे राहुल शिंदे यांची मागणी पारनेर | नगर सह्याद्री आर्थिक वर्ष संपत आल्याने जिल्हा बँकेकडून शेत...
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याकडे राहुल शिंदे यांची मागणी
पारनेर | नगर सह्याद्रीआर्थिक वर्ष संपत आल्याने जिल्हा बँकेकडून शेतकर्यांच्या कर्ज वसुलीच्या हालचाली सुरू असून अतिवृष्टी, अवकाळी व शेतीमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून गावागावातील शेतकर्यांची कर्ज वितरण केलेले आहे. पीक कर्जाऐवजी फक्त व्याजाची वसुली करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याकडे राहुल शिंदे यांनी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन योग्य ती मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच दत्ता पवार, सरपंच मनोज मुंगसे, सेवा सोसायटीचे संचालक राहूल पवार, सुनील पवार, उपसरपंच बाबा जवक, उद्योजक सुखदेव पवार, संतोष सरोदे, ओंकार मावळे, उमेश करंजुले, अजिंयतारा दरेकर, अनिल नलगे आदी उपस्थित होते. सेवा सोसायटी माध्यमातून शेतकर्यांना दिलेल्या पीक कर्जाची मुद्दल भरून न घेता फक्त व्याज भरून घ्यावे या मागणीचे निवेदन दिले. गेल्या वर्षभरापासून अवकाळी पाऊस आणि शेत मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकर्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी मागणी शिंदे पाटील यांनी केली.
नव्यानेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष झालेले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडे सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना दिलेल्या पीक कर्जाची मुद्दल भरुन न घेता फक्त व्याज भरुन घ्यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. राहुल पाटील शिंदे यांनी शेतकरी हित लक्षात घेऊन योग्य वेळी केलेल्या मागणीचे पारनेर तालयासह जिल्ह्यातून स्वागत होत आहे. मागणी मान्य झाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. यावर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
COMMENTS