मुंबई - फॅशनच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या उर्फीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. तिच्या फॅशनने अनेकांना गुपचूप केले आहे. सध्य...
मुंबई -
फॅशनच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या उर्फीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. तिच्या फॅशनने अनेकांना गुपचूप केले आहे. सध्या उर्फी आपल्या कपड्यांच्या स्टाईलमध्ये कोणत्याही गोष्टीचा वापर करुन ती फॅशन करण्याचा प्रयत्न करते. नेहमीच ट्रोल होणारी उर्फी कोणीही कितीही बोलु द्या त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. आता तर उर्फीने तिला डिवचणाऱ्यांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
उर्फीच्या एका मित्राने तिच्याविषयी धक्कादायक खुलासा करुन मोठी खळबळ उडवून दिली होती. फैझान अन्सारीने उर्फी ही तृतीयपंथीय असल्याचे सांगत आपल्याकडे त्याबाबत पुरावे असल्याची माहिती दिली होती. त्यावर अद्याप उर्फीची कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र तिच्या एका ट्विटनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण आपल्या बोल्डनेसचे जे काही प्रदर्शन करतो आहे त्याच्याविषयी लोकांची मतं आहे ते कशी चुकीची आहेत यावर उर्फीनं सांगितले आहे.
उर्फी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फॅशनच्या व्हिडीओ शेअर करते, उर्फीने नुकतेच तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, नग्न तर सारेच असतात. मी फक्त तुम्हाला कपड्यांच्या माध्यमातून सांगते तर काही जण त्यांच्या विचाराने तुम्हाला त्यांच्यातील नग्नता समजावून सांगत असतात. त्यामुळे बऱ्याचदा मला माझ्या राहणीमानावरुन जे काही बोलतात याचे मला काहीही वाटत नाही. लोकं काही समजावून घ्यायला तयार नाहीत.
उर्फीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंटस करत ट्रोल केले आहे. एक युजर म्हणतो, तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहेत. कारण तुमचे जसे कपडे आहेत तशीच तुमची विचार करण्याची पद्धतही आहे. अशा शब्दांत उर्फीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहे.
COMMENTS